‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येत्या काळात अफू आणि गांजाच्या शेतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे’

मुंबई : राज्यात वाईन विक्रीच्या निर्णयावरून विरोधी पक्ष प्रचंड संतापलेला दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सध्या वाद सुरु झाला आहे. अशातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर पार्ट – 2’ काढता येईल, असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत असताना येत्या काळात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अफू आणि गांजाच्या शेतीबाबत देखील निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं भातखळकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी दिली आहे. या निर्णायामुळे विरोधक प्रचंड संतापलेले असून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. तसेच महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.