‘मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसून विरोधी पक्षनेत्यांवर हल्ले केले जात आहेत’

मुंबई – शिवसेना आणि भाजपमधील (ShivSena and BJP) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेला शिंगावर घेणारे  भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ (Kalanagar signal)  हा हल्ला करण्यात आला आहे.

मातोश्रीबाहेरील रस्त्यावरून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकरत्यांनी त्यांची गाडी ओळखली आणि त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. दरम्यान, कंबोज ‘मातोश्री’ जवळ रेकी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप  करण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत मोहित कंबोज म्हणाले की, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणाहून परतत असताना कलानगरच्या जंक्शनच्या ठिकाणी माझ्या गाडीवर हल्ला केला. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसून विरोधी पक्षनेत्यांवर हल्ले केले जात आहेत.