स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा शकूर बनला पेंटर;  आता ‘फर्जी’ वेब सीरिज पाहून छापल्या खोट्या नोटा

Crime News – अभिनेता शाहिद कपूरची फर्जी   ही वेब सिरीज (Farzi web of actor Shahid Kapoor) पाहून दिल्लीतील एका टोळीनेही खोट्या नोटांचा धंदा सुरू केला होता, ज्याचा आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचा म्होरक्या शकूरने फर्जी वेब सिरीज पाहिल्यानंतर खोट्या नोटा छापण्यास सुरुवात केली होती.

राजस्थानच्या नागौर येथे राहणार्‍या शकूरने वेब सीरीजपासून कल्पना घेऊन स्वतःची टोळी तयार केली. शकूरने आपल्या टोळीत लोकेश, शिव, संजय आणि हिमांशू जैन यांसारख्या लोकांचा समावेश केला होता. त्यानंतर या लोकांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. ही टोळी दिल्ली एनसीआरमध्येही खोट्या नोटा विकायची. हे लोक छोट्या व्यावसायिकांना खोट्या नोटा विकायचे.

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सर्वप्रथम टोळीचा म्होरक्या शकूरला दिल्लीतील अक्षरधाम मंदिराजवळ पकडलं. त्यानंतर त्याच्या माहितीवरून संपूर्ण टोळीला राजस्थानमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 19 लाख रुपयांच्या खोट्या नोटा जप्त केल्या आहेत. ASI राज्यपाल आणि ASI अजय चौहान यांना साकुर मोहम्मद आणि लोकेश यादव नावाच्या दोन गुन्हेगारांबद्दल विशेष माहिती मिळाली होती, ज्यांच्यावर खोट्या नोटा चलनात आणल्याचा आरोप आहे.

खोट्या नोटांसोबतच पोलिसांनी 2 लॅपटॉप, 3 कलर प्रिंटर, 2 लॅमिनेशन मशीन, 2 पेन ड्राईव्ह, नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे कागदी पत्रे, शाई आणि केमिकल आणि नोटांवरचा ‘सुरक्षा धागा’ जप्त केला आहे. आरोपी.  ग्रीन फॉइल शीट आणि वापरलेल्या फ्रेम जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींचे मोबाईल हँडसेट, सिमकार्ड, एक क्रेटा कार आणि स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. बनावट नोटांच्या टोळीचा मास्टरमाइंड 25 वर्षीय आरोपी शकूर मोहम्मद हा पदवीधर आहे. तो व्यवसायाने पेंटर होता आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 2015 साली अजमेरला आला होता.

https://www.youtube.com/watch?v=fTZWF6rmkXs

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला