IND vs ENG: “थोड्या धावा काय केल्या, जास्त शहाणा बनतो…”, इंग्लंडच्या बेअरस्टोशी भिडला सरफराज खान

India vs England Dharamshala Test: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे युवा खेळाडू आणि इंग्लंडचे अनुभवी खेळाडू यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. प्रथम सरफराज खान आणि मार्क वुड, नंतर बेन स्टोक्स आणि सरफराज खान आणि आता तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो याच्याशी भारतीय क्रिकेटपटूंचे खटके उडाले. वास्तविक, भारताचा शुभमन गिल (Shubman Gill) या गोंधळात सामील होता आणि नंतर सरफराज खानने (Sarfaraz Khan) बेअरस्टोचा अहंकार दूर केला. कुलदीप यादवने बेअरस्टोची विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवताना ही घटना घडली.

काय होतं संपूर्ण प्रकरण?
खरे तर, पहिली गोष्ट अशी की, जॉनी बेअरस्टो वेगवान फलंदाजी करत असताना त्याने स्लिपवर उभ्या असलेल्या शुभमन गिलला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. शुबमन गिल आणि जेम्स अँडरसन यांच्यात काहीतरी चर्चा होत असताना बेअरस्टोने गिलला त्या क्षणाची आठवण करून दिली. त्यानंतरच अँडरसनने पुढच्या षटकात गिलला बाद केले. बेअरस्टोने याच घटनेबद्दल काहीतरी सांगितले. त्याला उत्तर देताना गिल म्हणाला की, किमान 100 झाले पण तुम्ही तिथेही पोहोचला नाही. ध्रुव जुरेलही गिलला सपोर्ट करताना दिसला.

यानंतर बेअरस्टो 39 धावांवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिथे सरफराज खानने बेयरस्टोचा अहंकार मोडला. बेअरस्टो जेव्हा मैदानाबाहेर जात होता तेव्हा सरफराज खान म्हणाला की थोड्या धावा काय केल्या तर जास्त शहाणा बनतोय. या गरमागरम संभाषण आणि बाचाबाचीचे व्हिडोओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या वादात भारताचे तीन उगवते स्टार्स शुभमन गिल, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर