दरारा.. वाघाचा काल पण आज पण आणि उद्याही; मोदींच्या काळाराम मंदिर भेटीवरुन ठाकरे समर्थकाची पोस्ट व्हायरल

Narendra Modi At Kalaram Temple:- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. मोदींच्या काळाराम मंदिर भेटीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत असताना शिवसैनिक व युवासेना विस्तारक पंकज गोरे (Pankaj Gore) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

२२ जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे २२ जानेवारीला आपण नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती.

याचा संदर्भ देत पंकज गोरे यांनी म्हटले की,  ‘शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी २२ तारखेला “काळाराम मंदिर” नाशिक येथे जाऊन दर्शन घेणार जाहीर काय केले, तर भाजपचे गल्ली ते दिल्ली सर्व नेते काळाराम मंदिरात जाऊ लागले. दरारा.. वाघाचा काल पण आज पण आणि उद्याही. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे.’ पंकज गोरे यांच्या या पोस्टवर ठाकरे समर्थकांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

चिंता करू नका ! तुमचा जन्म फौजदार होण्यासाठी झालाय; संघर्षमय कहाणीचा संघर्षयोद्धा पीएसआय रावसाहेब जाधव

माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’