मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का? आढळराव पाटील यांची अमोल कोल्हेंवर टीका

Shivajirao Adhalrao Patil : “पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का?” अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Loksabha) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणाऱ्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

कवठे येमाई येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पूर्वा दिलीप वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंगराव पांबूरकर, डॉ. सुभाष पोकळे, मारुतराव शेळके, सुदाम इंचके, अनिल शिंदे, बाळासाहेब बेडे, भगवान शेळके, बापूसाहेब शिंदे, प्रकाशराव पवार, सविताताई बगाटे आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले की, आता ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या वेळी केलेली चूक परत करू नका. संसदेत कोणी किती प्रश्न मांडले याचा हिशोब त्यांनी सांगितला. ते म्हणाले की विद्यमान खासदाराने संसदेत ६२९ प्रश्न मांडले, मी ११०२ प्रश्न मांडले. याचा वेध घेण्याची हीच वेळ आहे, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल