जागतिक साखर उत्पादनात 35 लाख टन घट; जाणून घ्या नेमकी कारणे काय ?

World Sugar Production : जागतिक साखर उत्पादनात यंदा 35 लाख टन घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जागतिक अन्न संघटनेने हा अंदाज वर्तवलाय. तांदूळ सारख्या इतर कमोडिटी बाजारांप्रमाणेच , दक्षिण आणि आग्नेय आशियातील प्रमुख निर्यातदार देशांमधील एल निनो-संबंधित उत्पादनातील कमतरतांमुळे जागतिक साखर बाजाराच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अपुरा पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा उसाच्या वाढीवर परिणाम झालाय. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. भारतात साखर उत्पादनात तब्बल 337 लाख टनांपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अलिकडच्या आठवड्यात साखरेच्या जागतिक किमती सप्टेंबर 2011 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) नुसार 2023/24 साठी भारताचे साखर उत्पादन 2022/23 साठी अंदाजित 36.6 दशलक्ष मेट्रिक टन वरून 33.7 दशलक्ष मेट्रिक टन (MT) पर्यंत खाली येऊ शकते. हा अंदाज ऑगस्टच्या अंदाजापेक्षा 7% कमी आहे.भारतच नव्हे तर चीन, थायलंड, पाकिस्तान या देशांतील साखर उत्पादनातही तूट होणार आहे.. त्यामुळे साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा