भाजप आमदार IASसोबत बांधणार लगीनगाठ; ३ राज्यांत रिसेप्शन, ३ लाख जणांना आमंत्रण

Bhavya Bishnoi: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचा नातू भव्य बिश्नोई याचा शाही विवाह (Bhavya Bishnoi Royal Wedding) 22 डिसेंबर रोजी होणार आहे. भव्य बिश्नोई हे आदमपूरमधील भाजपचे आमदार आहेत, त्यांचे लग्न राजस्थानच्या IAS परी बिश्नोईशी होणार आहे. या लग्नाला तीन लाखांहून अधिक पाहुणे येणार आहेत. लग्नानंतर नवी दिल्ली, हरियाणातील आदमपूर आणि राजस्थानमधील पुष्करमध्ये रिसेप्शन होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि व्हीव्हीआयपी सहभागी होणार आहेत.

माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांनी आदमपूर, हिसार येथील 55 गावांना भेटी देऊन लोकांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले की, माझे लग्न झाले तेव्हा माझे वडील आदमपूरच्या गावी आमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्याच धर्तीवर आता मी माझ्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आलो आहे.

ते म्हणाले की, आदमपूरचा समाज हा आमचा परिवार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः गावोगावी जाऊन लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले. कुलदीप यांचे मीडिया प्रभारी मोहित शर्मा यांनी सांगितले की, माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांनी आदमपूर नलवा मतदारसंघातील गावांना भेटी देऊन लोकांना आमंत्रित केले आहे.

लग्नानंतर रिसेप्शन कुठे होणार, किती पाहुणे येणार?
भव्य बिश्नोईचे लग्न 22 डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये होणार आहे. यानंतर 24 डिसेंबरला राजस्थानच्या पुष्करमध्ये पहिले रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये 50 हजार लोक उपस्थित राहू शकतात. 26 डिसेंबरला त्यांच्याच मतदारसंघात, हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभेत स्वागत समारंभ होणार आहे, ज्यामध्ये 1.5 लाखांहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. 27 डिसेंबरला नवी दिल्लीत रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये सुमारे तीन हजार व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री आणि अधिकारी येणार आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा राजकीय इतिहास
भाजप आमदार भव्य बिश्नोई यांचे आजोबा चौधरी भजनलाल हे दोनदा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते हरियाणातून एकदा राज्यसभेचे आणि तीन वेळा लोकसभेचे सदस्य होते. भजनलाल हे हरियाणाचे कृषी सहकार मंत्रीही राहिले आहेत. भजनलाल यांच्या पत्नी जसमा देवी याही आदमपूरमधून आमदार राहिल्या आहेत. कुलदीप बिश्नोई यांच्या पत्नी रेणुका बिश्नोई याही आदमपूर आणि हंसीच्या आमदार राहिल्या आहेत. कुलदीप बिश्नोई हे आमदार आणि खासदार राहिले आहेत.

कुलदीप बिश्नोई यांचे कुटुंब काँग्रेसशी संबंधित आहेत, त्यांनी नंतर हरियाणा जनहित काँग्रेस (बीएल) पक्षाची स्थापना केली. यानंतर त्यांनी पुन्हा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राजकीय फेरबदलात माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

कुलदीप यांचा मुलगा भव्य बिश्नोई यांनी आदमपूरमधून भाजपकडून पोटनिवडणूक लढवली होती, ज्यात त्यांनी माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश यांचा पराभव करून विजय मिळवला होता. कुलदीपचा भाऊ चंद्र मोहन बिश्नोई हे कालका मतदारसंघातून चार वेळा हरियाणा विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki