प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण…; लव्ह जिहादच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी मांडली लक्ष्यवेधी भूमिका

  जबलपूर- राज्यासह देशभरात सध्या लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा चांगलाच गाजत आहे. या विषयावर अनेक सामाजिक-राजकीय संस्था जनजागृतीचे काम करत आहेत. यावरून मोठे राजकारण देखील सुरु असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.

मुंडे या मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांना लव्ह जिहाद बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली ठाम भूमिका व्यक्त केली. प्रेम हे प्रेम असतं. प्रेम कोणत्या भिंती पाहत नाही. प्रेमात कोणत्या भिंती नसतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.(Pankaja Munde’s opinion on the issue of love jihad).

जर दोन लोक निर्मळपणे प्रेमाने एकत्र येत असतील तर त्याचा सन्मान केला पाहिजे. मात्र, त्यामागे काही कटुता किंवा चालबाजी असेल तर त्या प्रकाराला वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंद्रेश कुमार हेही उपस्थित होते.