Hardik Pandya | मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या हसतो कसा? माजी क्रिकेटपटूच्या तळपायाची आग मस्तकात

Hardik Pandya | सोमवारी आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सविरुद्ध 9 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 179/9 धावा केल्या. त्यास प्रतिसाद म्हणून राजस्थानने 18.4 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य साध्य केले. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशा धूसर झाल्या आहेत. या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) वक्तव्य ऐकून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने नाराजी व्यक्त केली आहे.

हार्दिक पांड्याने सामन्यानंतर हसत सांगितलं होतं की, ”खेळाडूंवर टीका करण्याची ही वेळ नाही. कारण संघात सर्वच व्यवसायिक आहेत.” या वक्तव्यानंतर डेल स्टेन तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

डेल स्टेनने आपल्या एक्स अकाउंटवरून विनंती करत लिहिलं आहे की, “माझे लक्ष त्या दिवसांवर आहे, जेव्हा खेळाडू त्यांच्या मनात काय आहे ते प्रामाणिकपणे सांगतील. सध्या आपण सुरक्षित गोष्टी सांगून स्वतःला आणि आपल्या मेंदूला मूर्ख बनवत आहोत. पुढचा सामना हरतो, हसतो आणि मग तोच मूर्खपणा पुन्हा करतो.” डेल स्टेनने अप्रत्यक्षरित्या ही टीका केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका