हेमंत रासने यांच्या पदयात्रेत पंकजा मुंडे यांचा सहभाग, मतदारांचा मोठा प्रतिसाद

पुणे: भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Bypoll Election) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) सहभागी झाल्या (Pankaja Munde In Kasba) होत्या. या पदयात्रेला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. पालखी चौक येथून सुरू झालेली प्रचार यात्रा वटेश्वर, गाडीखाना, शिवाजी महाराज रस्त्याने आंग्रे वाडा येथे समाप्त झाली. समारोपप्रसंगी मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या.

उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ, कसब्याचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, स्थानिक नगरसेवक सम्राट थोरात, आरती कोंढरे, अजय खेडेकर, विजयालक्ष्मी हरिहर, तेजेंद्र कोंढरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते

आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो त्यामुळे कार्यकर्ता अलर्ट राहतो. कधी कधी मते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता या नेता या नात्याने या ठिकाणी प्रचाराला आली आहे, असे मुंडे म्हणाल्या.

मुंडे पुढे म्हणाल्या, ‘कसब्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे त्यामुळे विजय निश्चित आहे. पक्षासाठी पक्षाच्या जन्मापासून आयुष्य वेचलेले खासदार गिरीश बापट हे पक्षाच्या निवडणुकीत सहभाग घेऊन हेमंत रासने आशीर्वाद यांना देण्यासाठी प्रचारात सहभागी झाले होते.’