#Breaking : सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

मुंबई – विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे इथंही चुरस रंगणार यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालाने विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची भाजपने तयारी केली आहे. तर रयतचे सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.(Sadabhau Khot withdraws from Legislative Council elections).

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न सुरू होते मात्र महाविकास आघाडीत परस्परांविषयी निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणानंतर कोणीच माघार घेण्यास तयार नाही असं चित्र दिसून आलं. पुरेशी मते नसली तरी दोन्ही जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. आपले उमेदवार जिंकवून मैदान मारण्याचा निर्धार भाजपने केला असला तरी तेवढय़ा मतांचे गणित जुळणे कठीण आहे.