पीरियड्समध्ये ‘या’ रंगाचे रक्त जात असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा! मासिक पाळीतील रक्त आरोग्याविषयी देते माहिती

मासिक पाळीचे (Periods) काही दिवस असे असतात की, प्रत्येक स्त्रीला तिला पाहिजे असो किंवा नसो त्यातून जावे लागते. आजकाल सर्व महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. साधारणपणे मासिक पाळीदरम्यान हात, पाय, पाठ दुखणे, बद्धकोष्ठता, अंगदुखी ही लक्षणे सामान्य आहेत.

सामान्यतः महिलांना मासिक पाळी दरम्यान रक्ताचा रंग लाल असतो, असे वाटते. पण प्रत्येक महिलेच्या बाबतीत असे असू शकत नाही. जर तुम्ही कधी लक्षात घेतले असेल, तर तुम्हाला असे आढळले असेल की मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी रक्ताचा रंग (Blood Colour) वेगळा असतो. पीरियड्सच्या रक्ताचा रंग गडद तपकिरी ते फिकट गुलाबी असू शकतो. काहीवेळा तो काळा देखील असू शकतो आणि विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक रंग आपल्या आरोग्याविषयी विशेष माहिती देतो.

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीत रक्ताचा रंग तुमच्या आरोग्याशी संबंधित अंतर्गत गोष्टी सांगतो.

1) गडद रंगाचा रक्त प्रवाह
जर तुमच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग गडद तपकिरी असेल तर याचा अर्थ गुप्तांगातून रक्ताचा प्रवाह खूप मंद आहे. आणि जे रक्त वाहत आहे ते जुने रक्त आहे. हे रक्त गर्भाशयात बराच काळ साठून राहून नंतर वाहते. सहसा गडद तपकिरी रंगाच्या रक्ताचा प्रवाह सकाळी होतो.

2) लाल रंगाचा रक्त प्रवाह
जर तुमच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग लाल असेल तर याचा अर्थ हे रक्त नव्याने तयार झाले आहे आणि खूप लवकर वाहत आहे. हे रक्त खूप हलके असते, परंतु जेव्हा दिवसा प्रवाह वेगवान असतो तेव्हा लाल रंगाचा स्त्राव होतो.

3) हलका लाल रंगाचा रक्तप्रवाह
जर तुम्हाला हलका लाल रंग येत असेल तर याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात. हा प्रवाह सामान्यतः मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी होतो. तज्ञांच्या मते, केवळ दीर्घ कालावधीचे चक्र असलेल्यांनाच असा प्रवाह असतो, जो नंतर काहीसा गडद होतो.

4) काळा किंवा गडद रंगाचा रक्त प्रवाह
जर तुम्हाला काळा किंवा गडद रंगाचा रक्त प्रवाह होत असेल, तर तुमच्या गर्भाशयात संसर्ग होऊ शकतो किंवा ते गर्भपाताचे सूचक देखील असू शकते. मासिक पाळीच्या सर्व दिवसांमध्ये जर तुम्हाला गडद रंगाचे रक्त येत असेल तर उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.

5) केशरी रंगाचा रक्त प्रवाह
तुमच्या मासिक पाळीच्या सर्व दिवसांमध्ये केशरी रंगाचे रक्त प्रवाह होत असल्यास ते हलक्यात घेऊ नका. हे संसर्गाचे लक्षण असू शकते.

(टिप- हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. त्याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. आझाद मराठी त्याची पुष्टी करत नाही.)