शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना मातृशोक, लतिकाताई यांचे पुण्यात निधन

पुणे- राजकीय क्षेत्रातून अतिशय दुख:द बातमी पुढे येत आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना मातृशोक झाल्याची माहिती समोर येत आहे. विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्या आई (Neelam Gorhe Mother Passed Away) लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या.

अंत्यदर्शन वेळ दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॅाक्स हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, पुणे येथे घेता येणार आहे. तर अंत्यसंस्कार हे ५ वा वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे होणार आहेत.