आधी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली,आता टिपू सुलतानच्या फोटोला घातला हार; आंबेडकरांच्या कृतीने फुटले नव्या वादाला तोंड 

सांगली :  वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीला भेट दिली होती. यानंतर आता  सांगलीत वंचित बहुजन आघाडीची  सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) फोटोला हार घालून सभेला सुरुवात केली.

टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते. पण पोलिस खात्याला आवाहन आहे पाच वर्षानंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलते.आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. पण आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ABP माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

“प्रत्येकाने स्वतःबरोबर १० मतदार ठेवा”

“उद्याची सत्ता आपल्याला बदलायची आहे. ही सत्ता बदलण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावं. या सभेला उपस्थित आहेत त्या सर्वांनी असा निश्चिय करा की, मी माझ्याबरोबर १० मतदार ठेवणार आहे. ते १० मतदार या सरकारच्या विरोधात मतदान करतील आणि सत्तापरिवर्तन घडेल,” असं आवाहन आंबेडकरांनी उपस्थितांना केलं.