प्रकाश आंबेडकरांना अटक करा; नारायण राणेंची थेट मागणी

Arrest Prakash Ambedkar; demand of Narayan Rane : राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबर नंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला होता. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले,  राज्यात दंगली होतील, हे प्रकाश आंबेडकर यांना कसे माहीत? अशी विचारणा केंद्रीय सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे केली. माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आंबेडकर यांच्यावर टीका करताना ते पुढे म्हणाले,  राजकीय महत्त्व संपलेले लोक असे बोलतात. दंगल होणार असेल तर त्याचा सबळ पुरावा द्यावा लागतो. दंगल कोण करणार ? कुठे होणार ? याची माहिती द्यावी लागते. आंबेडकरांना याची माहिती असेल तर माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार