आजवरच्या सर्व FIFA World Cup विजेत्यांची यादी, ‘या’ संघाने सर्वाधिकवेळा पटकावलीय ट्रॉफी

FIFA World Cup Winners List: फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवार, 18 डिसेंबर रोजी फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांकडे प्रत्येकी दोन विश्वचषक ट्रॉफी आहेत, त्यामुळे हे दोन्ही संघ रविवारच्या सामन्यात तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

कतार येथे झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियाला  3-0 ने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव केला होता. फ्रान्सने मोरोक्कोला 2-0 ने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

22 वा फिफा विश्वचषक कतारमध्ये खेळला जाणार आहे. इतिहासातील पहिला फुटबॉल विश्वचषक 1930 साली उरुग्वे येथे खेळला गेला. येथे आम्ही तुम्हाला आतापर्यंत खेळलेल्या सर्व फुटबॉल विश्वचषकातील विजेत्या संघांची नावे सांगणार आहोत. यासोबतच अंतिम फेरीत कोणत्या संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी कोणत्या संघाकडे सर्वाधिक फुटबॉल विश्वचषक ट्रॉफी आहेत हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे.

कोणत्या संघाकडे सर्वाधिक विश्वचषक ट्रॉफी आहेत?
ब्राझील – 5
जर्मनी – 4
इटली – 4
उरुग्वे – 2
अर्जेंटिना – 2
फ्रान्स – 2
इंग्लंड – 1
स्पेन – 1

फिफा विश्वचषक कधी, कोणत्या संघाने जिंकला? (वर्ष, विजेते, उपविजेते)

  • 1930- उरुग्वे (विजेते), अर्जेंटीना (उपविजेते)
  • 1934- इटली (विजेते), चेक रिपब्लिक (उपविजेते)
  • 1938- इटली (विजेते), हंगेरी (उपविजेते)
  • 1950- उरुग्वे (विजेते), ब्राजील (उपविजेते)
  • 1954- जर्मनी (विजेते), हंगेरी (उपविजेते)
  • 1958- ब्राजील (विजेते), स्वीडन (उपविजेते)
  • 1962- ब्राजील (विजेते), चेक रिपब्लिक (उपविजेते)
  • 1966- इंग्लंड (विजेते), जर्मनी (उपविजेते)
  • 1970- ब्राजील (विजेते), इटली (उपविजेते)
  • 1974- जर्मनी (विजेते), नीदरलैंड्स (उपविजेते)
  • 1978- अर्जेंटीना (विजेते), नीदरलैंड्स (उपविजेते)
  • 1982- इटली (विजेते), जर्मनी (उपविजेते)
  • 1986- अर्जेंटीना (विजेते), जर्मनी (उपविजेते)
  • 1990- जर्मनी (विजेते), अर्जेंटीना (उपविजेते)
  • 1994- ब्राजील (विजेते), इटली (उपविजेते)
  • 1998- फ्रांस (विजेते), ब्राजील (उपविजेते)
  • 2002- ब्राजील (विजेते), जर्मनी (उपविजेते)
  • 2006- इटली (विजेते), फ्रांस (उपविजेते)
  • 2010- स्पेन (विजेते), नीदरलैंड्स (उपविजेते)
  • 2014- जर्मनी (विजेते), अर्जेंटीना (उपविजेते)
  • 2018 फ्रांस (विजेते), क्रोएशिया (उपविजेते)