‘हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला..वाचवा!’

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. एका मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी फेसबुक पोस्ट लिहिली असून त्याला कुचिक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मुलीबाबत आपण गृहमंत्र्यांसह पोलिसांनाही कळवलं. मात्र एकानंही याची दखल घेतली नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. कुचिक पीडित मुलीवर दबाव आणत आहे, असा आरोप चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलाय.