द काश्मीर फाईल्स चित्रपट म्हणजे विषारी डोक्याच्या संघी दिग्दर्शकाने घेतलेली सुपारी आहे – वागळे

 मुंबई – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर पत्रकार निखील वागळे यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ते म्हणतात, काश्मीर फाईल्स नावाच्या एका सुमार चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. हा चित्रपट म्हणजे विषारी डोक्याच्या संघी दिग्दर्शकाने घेतलेली सुपारी आहे. काश्मिरी पंडितांच्या दुःखाचा बाजार मांडून केलेलं हे राजकारण आहे. असं वागळे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, याच दिग्दर्शकाने ताश्कंद फाईल्स नावाची टुकार फिल्म बनवली होती.तो मोदींचा भाट आहे. सहाजिकच, इतिहासाची मोडतोड हा त्याचा धंदा आहे. संगीतकार सलील कुलकर्णी, गायक महेश काळे वगैरे पुणेरी संघी सोशल मिडियावर या सिनेमाचं बेफाम कौतुक करताहेत, यात काही आश्चर्य नाही. अनेकांचे बुरखे असे फाटणार पुन्हा! असं ते म्हणाले.