Porsche car Accident | पुणे पोलिसांचा कारवाईचा धडाका; विशाल अग्रवालला अटक केल्यानंतर आता ‘या’ तिघांच्या मुसक्या आवळल्या

पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche car Accident ) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Porsche car Accident ) यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता पुणे पोलिसांनी या प्रकरणात कारवाईचा धडाका लावला आहे.

विशाल अग्रवाल यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मँनेजर्सना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपींविरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप