“ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे मोठे उपकार आहेत”, नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Nitin Gadkari On Brahman Reservation: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लक्षवेधी वक्तव्य केले आहे. ब्राह्मणांना कोणतंही आरक्षण नाही, हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार आहेत, असे विधान गडकरींनी केले आहे. ते पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.

“मला सात डॉक्टरेट मिळाल्या. पण मी नावापुढे डॉक्टर नाही लावत. मी दहावीला होतो. तेव्हा एमर्जन्सी लागली. त्या आंदोलनात मी होतो. त्यात वर्ष गेलं. मला दहावीत 52 टक्के मार्क मिळाले. सायन्समध्ये 49 टक्के मिळाले. माझ्या बहिणीचे मिस्टर सायंटिस्ट होते. आमच्या घरीही शिकलेली मंडळी होते. त्यावेळी माझी लाईन ठिक नाही असं घरच्यांना वाटायचं. तेव्हा, मी नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा होईल, असं सांगायचो. तेव्हा घरचे हसायचे. आपल्याकडे बँकेत किंवा शिक्षकाची नोकरी करतात. परमेश्वराने ब्राह्मणांवर खूप मोठे उपकार केले. त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. त्यामुळे ते वडापावचं दुकान टाकत आहेत. सलून टाकत आहे. पुण्यातील प्रत्येक घरातील मुलगा अमेरिकेत गेलाय,” असं नितीन गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली