राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा उचलला होता – प्रकाश आंबेडकर

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी (MVA) सरकार पाडण्याचा विडा उचलला होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले. ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले.

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे. असं म्हणत कॉंग्रेसवर देखील प्रहार केला आहे.