Prarthana Behere कडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, शिवभक्त नाराज झाल्यानंतर मागितली माफी

Prarthana Behere : काल शिवजयंतीनिमित्त राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लातूरच्या उदगीर येथील एका मॉलच्या उद्धाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी उद्धाटनादरम्यान प्रार्थनाने छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. तिच्या या कृतीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर शिवप्रेमींनी उदगीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. अभिनेत्रीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने नवा व्हिडीओ बनवून शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

प्रार्थना बेहेरे म्हणाली आहे,”आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय”. असे प्रार्थनाने तिच्या या माफीनाम्यात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा