Supriya Sule | लोकं दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात….; सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

Supriya Sule | आमच्या विरोधात १८ वर्षांत न बोलणारे आज आमच्याविरोधात वैयक्तिक टीका करत आहेत. मी आणि अमोलदादा कुणावरही अशी टीका करत नाही. ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे. लोकं दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. पण सगळ्यांना मी सांगते जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, माझ्यावरही अमोल कोल्हेंसारखीच टीका केली जाते की मी दहा वर्षांत केंद्रातला कुठलाच निधी आणला नाही. मी विनम्रपणे त्यांना सांगू इच्छिते की माझा मराठीत असलेला कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल. तो कार्य अहवाल मी सगळ्यांना पाठवणार आहे.

माझा कार्य अहवाल जर तुम्ही वाचला तर जे सगळे टीका करणारे मलाच मतदान करतील याची मला गॅरंटी आहे. ही शब्द देते म्हणून गॅरंटी आहे तसली गॅरंटी नाही. आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन भाषण करणार नाही. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे. असेही सुळे यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले