कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप उदयनिधीने केलंय; शिंदेंचा हल्लाबोल

Udayanidhi : INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.उदयनिधीने शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.असं वक्तव्य करत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Sanatan Dharma : इंडिया आघाडीतील नेता बरळला; सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली

दरम्यान, या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांनी उदयनिधीला चांगलेच फैलावर घेतले आहे. ते म्हणाले, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी. असं देखील शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या 200 रुपयांनी स्वस्त होणारे गॅस सिलिंडर खरोखरच बहिणींसाठी रक्षाबंधन भेट ठरेल का?

Sanatan Dharma : इंडिया आघाडीतील नेता बरळला; सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे