त्रिशतक झळकावणाऱ्या सलामीवीराची एंट्री होणार, दुसऱ्या टी-20मध्ये न्यूझीलंडची आता खैर नाही 

Ind vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात खराब सलामीचा फटका भारतीय क्रिकेट संघाला (Indian cricket Team) सहन करावा लागला. वनडेत चमत्कार घडवणारा शुभमन गिल (Shubman Gill) अपयशी ठरला तर इशान किशनची (Ishan Kishan) बॅटही शांत राहिली. पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड टी-20 मध्ये सलामी करताना धडाकेबाज खेळ करणाऱ्या या तरुणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतात. शुभमन गिलला डावलून ही संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील महत्त्वाचा सामना रविवारी होणार आहे. पहिला सामना जिंकून पाहुण्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे मालिकेत टिकण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात.

शुभमन गिलने आतापर्यंत टी-20मध्ये निराशा केली आहे. दुसऱ्या T20 मध्ये त्याच्या जागी युवा पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला संघात स्थान दिले आहे.

पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) टीम इंडियात शतकासह पदार्पण केले होते, मात्र त्यानंतर दुखापती आणि खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळावे लागले. आता तो टी-20 संघात परतला असून त्याला दुसऱ्या सामन्यात खेळायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. या फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये मोठ्या खेळी खेळल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टी-२० फॉर्मेटमध्ये शतक, विजय हजारे ट्रॉफीच्या वनडे फॉरमॅटमध्ये द्विशतक आणि टेस्ट फॉरमॅट रणजी ट्रॉफीमध्ये ट्रिपल सेंच्युरी केली आहे.

अलीकडेच जेव्हा पृथ्वीने आसामविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात ३७९ धावांची खेळी केली तेव्हा निवडकर्त्यांनी त्याला टीम इंडियात स्थान देण्यास भाग पाडले. पृथ्वीची ही खेळी रणजी इतिहासातील दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. या वैयक्तिक कामगिरीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही त्यांचे अभिनंदन केले.