“लाठीमारासाठी वरून आदेश आले हे सिद्ध करा, मी…’’ अजित पवारांचं थेट आव्हान

Maratha Reservation :-  जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देऊन आज बुलढाणा येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कारवाईबाबत घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पोलिसांना लाठीमारसाठी आदेश दिल्याच्या होत असलेल्या आरोपांवर भाष्य केले आहे.

मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरून आदेश आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू. पण कारण नसताना उगाचच शंका निर्माण करायची. गैरसमज निर्माण करायचे. समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची. त्यातून आपल्याला काही साध्य करता येतं का, अशा प्रकारचा जो केविलवाणा प्रयत्न चालवलेला आहे. तो आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही, असे अजित पवार म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितलं की, आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, याची ओळख सर्वांनी डोळ्यांसमोर ठेवली पाहिजे. तसेच यापुढे ही आंदोलनं थांबवली पाहिजेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन कऱण्याचा अधिकार सर्वांना आहे. तो कुणीही हिरावून घेणार नाही. पंरतु ज्यातून इतरांना त्रास होईल इतरांना अडचणी येतील, असं काही करू नका, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

पेढे वाटा पेढे…. जसप्रीत बुमराह बनला बाबा, पत्नी संजनाने गोंडस मुलाला दिला जन्म