विरोधकांनी कितीही केला खेला तरी नरेंद्र मोदींचा सुरू आहे रोजगार मेला – रामदास आठवले

मुंबई/चेन्नई – जरी विरोधकांनी केला कितीही खेला तरी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) प्रत्येक महिन्याला सुरू आहे रोजगार मेला अशी काव्यमय सुरुवात करून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात 10 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचा प्रधानमंत्री मोदींनी घेतलेला निर्णय अत्यंत क्रांतिकारक निर्णय आहे. त्यानुसार दर महिन्याला 71 ते 75 हजार जणांना सरकारी नोकरी देण्याची प्रधानमंत्री मोदींची मोहीम अव्याहत सुरू आहे. त्यांनी देशात स्टार्ट अप इंडिया (Start Up); मेक इन इंडिया (Make In India) आदी योजनांद्वारे तसेच विविध केंद्रीय मंत्रालयाद्वारे लाखो लोकांना स्वयंरोजगार दिला आहे आणि सतत रोजगार स्वयंरोजगार देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून देशातील 10 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून आज चेन्नई सह देशभरातील 45 ठिकाणी 71 हजार जणांना सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र देणाऱ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.चेन्नई येथील वल्लाज़ाह रोड कलैवणार अरंगम ओडिटोरियम मध्ये केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते 150 जणांना सरकारी नोकरी चे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रामदास आठवले यांनी युवकांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रधानमंत्री कार्यालयाने चेन्नई येथील रोजगार मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची जबाबदारी रामदास आठवले यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार रामदास आठवले आज चेन्नई येथील रोजगार मेळाव्यास उपस्थित राहिले.