भाजपच्या संकटमोचकाची जादू चालली तर शिवसेनेच्या उमेदवाराचा होऊ शकतो पराभव

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा (Reputation of Mahavikas Aghadi government) या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) कोणताही धोका पत्करायचा नाही, असे धोरण ठेवून शिवसेना आमदारांना (Shiv sena MLAs) आता मडमधल्या ‘रिट्रीट’मध्ये पाठवण्यात आले. सध्या दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक (Bharatiya Janata Party’s troubleshooter) म्हटले जाते, पक्षाच्या राज्यातील सत्ताकाळात त्यांनी अनेक राजकीय जबाबदाऱ्या पार पाडत यश मिळवून दिले. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची पुन्हा जादू राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) चालणार का, ते कोणत्या आमदारांना गळाला लावणार, यावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यसभेत भाजपचा तिसरा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यात ते यशस्वी होतात का, त्यावर बरीच गणित अवलंबून आहेत.

नुकतीच गिरीश महाजन यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तब्बल दोन तासांच्या या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आपण बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) पाठिंब्यासाठी इथे आलो असल्याचे सांगितले. या भेटीत महाजन यांनी ठाकूर यांच्याकडून पाठिंब्यासाठीचा शब्द घेवूनच बाहेर पडले अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ठाकूर यांनीही राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवा म्हणून महाजन आले होते, असे सांगितले. मात्र आम्ही अजून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला नाही, असेही स्पष्ट केले.