‘बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते, तुमचे विचार…’, नारायण राणेंची सडकून टीका

Narayan Rane vs Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) नाव सांगण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नाही. बाळासाहेबांना जितका मनस्ताप इतरांनी दिला नाही त्याहून अधिक मनस्ताप उद्धव ठाकरेंनी घरात बसून दिला. बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. कोणाचे चांगले पाहवत नाही, साहेबांचे विचार हिमालयाच्या उंचीचे तर उद्धव ठाकरेंचे विचार टेकडीही नाही, असा शब्दांत नारायण राणेंनी (Narayan Rane) उद्धव ठाकरेंवर टीका केली.

नारायण राणे म्हणाले की, काही गोष्टी वाचल्यानंतर वेदना होतात, बाळासाहेबांचा तो काळ आणि आजचा काळ खूप फरक आहे. बाळासाहेबांचा असा मुलगा असू शकतो वाटत नाही. बाळासाहेबांच्या खूप जवळ मी राहिलोय, बाळासाहेबांचा विचार होता. एकनाथ शिंदे फार संयम बाळगतायेत. संयम ठेऊ नका. चांगला कारभार सुरू आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दंगल झाली, शिवसैनिकाचा अपघात झाला, कोण कुठे निधन झाले तरी तुम्ही कुठे गेलात का? आम्ही एकही कोपरा सोडला नाही, खिशात पैसे नसताना शिवसैनिकांच्या मदतीला जायचो. आता कुणीच नाही. योग्यवेळी परिवर्तन झाले हा इतिहास आहे. वाईट कृत्य करणाऱ्याला महाराष्ट्रात संपवलं जाते ही किमया छत्रपतींची आहे. बाळासाहेबांचे तुमच्याबाबत काय मत होते हे मला माहिती होते असा टोलाही राणेंनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

पेढे वाटा पेढे…. जसप्रीत बुमराह बनला बाबा, पत्नी संजनाने गोंडस मुलाला दिला जन्म

“लाठीमारासाठी वरून आदेश आले हे सिद्ध करा, मी…’’ अजित पवारांचं थेट आव्हान