पेढे वाटा पेढे…. जसप्रीत बुमराह बनला बाबा, पत्नी संजनाने गोंडस मुलाला दिला जन्म

Jasprit Bumrah Baby Boy: भारत विरुद्ध नेदरलँड (India vs Netherland) संघात पल्लेकल्ले येथे आशिया चषक २०२३ चा (Asia Cup 2023) सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) उतरलेला नाही. त्याने या सामन्यापूर्वी अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे तो या सामन्याचा भाग नाही. पण बुमराहचे असे अचानक भारतात परतण्याचे कारण काय आहे?

तर बुमराह लवकरच वडील बनला (Jasprit Bumrah Become Father) आहे. होय, बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बुमराहने इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. बुमराहने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या मुलाचे नाव देखील सांगितले. बुमराहने आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवले आहे. बुमराहने लिहिले की, “आमचे छोटे कुटुंब मोठे झाले आहे आणि आमचे हृदय पूर्णपणे भरले आहे. आज सकाळी आम्ही आमचा लहान मुलगा अंगद जसप्रीत बुमराह याचे स्वागत केले. आमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी आम्ही खूप आनंदी आणि उत्साहित आहोत. ”

जसप्रीत बुमराह रविवारी भारतीय संघाला सोडून घाईघाईने मुंबईला रवाना झाला. बुमराह नेपाळविरुद्धच्या सामन्यालाही मुकला आहे. मात्र, बूम-बूम बुमराह स्पर्धेतील सुपर-४ फेरी सुरू होण्यापूर्वी भारतीय संघात सामील होईल. बुमराहने बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

येथे वाचा आणखी बातम्या-

भारत वि. पाकिस्तान सामन्यात पावसाचा विजय, इशान आणि हार्दिकच्या झुंजार खेळी पाण्यात

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द, मात्र ‘या’ तारखेला पुन्हा भिडू शकतात संघ! जाणून घ्या समीकरण

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे