पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूत भरती

Pune: पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जाहीर करत गिरीश बापट यांच्या प्रकृतीबद्दल (Girish Bapat Health Update) माहिती दिली आहे.

भाजप खासदार गिरीश बापट यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या  मेडिकल बुलेटीनमध्ये दिली आहे.