TCS ने पगार वाढवून कर्मचाऱ्यांना दिली भेट, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला 15% पर्यंत पगारवाढ मिळाली

TCS Salary Hike:  IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केल्याचे जाहीर केले आहे. जागतिक आर्थिक संकटामुळे IT क्षेत्रातील मंदी असतानाही TCS ने 1 एप्रिल 2023 पासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात वाढ केली आहे.

पहिल्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेदरम्यान, TCS CFO समीर सेकसरिया यांनी सांगितले की 1 एप्रिल 2023 पासून कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात वाढ केली आहे. त्यांनी सांगितले की पगारवाढीमुळे ऑपरेटिंग मार्जिनच्या 23.2 टक्क्यांवर 200 बेसिस पॉइंट्सचा परिणाम दिसून येत आहे. TCS चे मिलिंग लक्कर यांनी सांगितले की कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना 12 ते 15 टक्के पगारवाढ दिली आहे. याशिवाय पदोन्नतीही देण्यात आली आहे.

TCS ने एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत 523 नवीन कर्मचारी जोडले आहेत. एट्रिशन रेट कमी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचा अर्थ कंपनीतून राजीनामा देणाऱ्यांची संख्या घटली आहे. 30 जून 2023 पर्यंत, TCS च्या कर्मचाऱ्यांची संख्या 6,15,318 झाली आहे. जागतिक संकट आणि आयटी क्षेत्रातील मंदीमुळे नोकरभरतीत घट होत आहे.कंपनीने सांगितले की TCS मध्ये 154 देशांचे नागरिक कर्मचारी म्हणून तैनात आहेत, ज्यामध्ये 35.8 टक्के महिला आहेत.

मिलिंद लक्कर म्हणाले की, आमचे लक्ष सर्वोत्तम प्रतिभा विकसित करणे, त्यांना टिकवून ठेवणे आणि त्यांना बक्षीस देणे यावर आहे. त्यांनी सांगितले की 55 टक्के कर्मचारी आता आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येत आहेत.   टीसीएसमध्ये पगारवाढीची बातमी आली आहे, तर याआधी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, आणखी एक दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलला आहे. आयटी क्षेत्रावरील जागतिक संकटाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.