Pune Crime: कोयत्याचे सपासप वार; पुण्यात ग्रामपंचायत सदस्याला पाठलाग करत संपवलं

Pune Crime News : पुण्यातील खेड तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तालुक्यात असणाऱ्या सेझ प्रकल्पात असणाऱ्या कंपन्यामधील व्यावसायिक स्पर्धेतून कनेरसर ग्रामपंचायतीचा सदस्य असलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वर्चस्वातून ही हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष रामदास दौंडकर (Santosh Ramdas Daundkar) वय 32 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते ग्रामपंचायत सदस्य होते. व्यवसायिक स्पर्धेतून ही हत्याचा झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संतोष यांच्या चेहऱ्यावर कोयत्यानं वार करण्यात आले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.(Pune Murder)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काही प्रमाणात काम सुरू आहे. संतोष दौंडकर यांनी क्रेनचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे अनेक कंपन्यामध्ये क्रेन पुरविण्याचे काम ते करत होते. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी व्यवसायात यश मिळवत व्यवसाय वाढवला होता.संतोष हे काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनजवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. संतोष यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताचा अंगठा तुटून पडला. हल्लेखोर हल्ला करतच होते. आपला बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ही हत्या सराईत गुन्हेगारांनी केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, चार वर्षांपूर्वी कनेरसरच्या माजी उपसरपंचाचा देखील असाच खून झाला होता. त्यामुळे या परिसरात पोलीस चौकी असावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=fTZWF6rmkXs

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला