दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून १०० कार्यकर्ते दाखवावे; निलेश राणेंनी उडवली खिल्ली

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काल खा. शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायची मनिषा बोलून दाखवली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

कोल्हे म्हणाले, जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.‘ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल. संसद भवनातला शिवरायांचा पुतळा सुद्धा याबद्दल समाधान व्यक्त करेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, कोल्हे यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यावरून विरोधक त्यांची खिल्ली उडवत आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी म्हणाले, पवार साहेब राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही. पवार साहेबांच नेतृत्व महाराष्ट्रात फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे त्यात पण पूर्ण १००% टक्के नाही. दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून १०० कार्यकर्ते दाखवावे असे आवाहन देखील त्यांनी दिले आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील याच मुद्यावरून शरसंधान केले आहे. ते म्हणाले कोल्हे साहेब, स्वप्न बघायला काय हरकत नाही. राज्याच्या आता पर्यंतच्या प्रवासात दोन अंकी आकड्याचा पाठबळ सुद्धा कधी मिळाला नाही. तरी, तुम्ही पंतप्रधान पदाची स्वप्न बघताय त्या स्वप्ननान माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. तुमची स्वप्न ही स्वप्नच राहोत..असा टोमणा त्यांनी मारला आहे.