Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ

Pune LokSabha | अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या‌ जागा ठरवत असत, पवार साहेब कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची आवस्था काय आहे, ऐवढे मिंधे होण्याची गरज काय, भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले. उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे, अशी‌ कानउघडणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी केली.

पुणे लोकसभा (Pune LokSabha) मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी,अजित दरेकर,संजय बालगुडे, नीता परदेशी, सुजित यादव, रफिक शेख, पोळेकर, मेहबूब नदाफ, गुलाम हुसेन, राज अंबिके उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा