Loksabha Election | दोन पक्ष फोडल्याचे परिणाम दिसतील, काँग्रेसचा फडणवीस आणि भाजपावर घणाघात

Loksabha Election | फडणवीस व भाजपने सुड उगवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. पवार साहेबांच्या‌ पुण्यास मोदी‌-शहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेणे, षडयंत्र रचणे लोकांना पटलेलं नाही. षडयंत्र करणारे कोण आहेत, माहिती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे‌ केवळ मोहरे आहेत. उमेदवार बदलले, स्वाभिमान शिल्लक राहिला नाही. अजित पवारांना चार उमेदवार दिले त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले, अशी‌ टीका अखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार (Loksabha Election) संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी,अजित दरेकर,संजय बालगुडे, नीता परदेशी, सुजित यादव, रफिक शेख, पोळेकर, मेहबूब नदाफ, गुलाम हुसेन, राज अंबिके उपस्थित होते.

शिंदे – पवारांनी पायावर दगड मारून घेतला
अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या‌ जागा ठरवत असत, पवार साहेब कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची आवस्था काय आहे, ऐवढे मिंधे होण्याची गरज काय, भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले. उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा