Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल

Sunil Tatkare | जातीयवादी शक्ती आज धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवत आहेत परंतु त्यांनी ‘ईद मुबारक’ कधी म्हटले आहे का अशी विचारणा करतानाच आम्ही धर्मनिरपेक्ष विचार घेऊन आपल्यात सेवेत काम करत आहोत. माझ्यावर विश्वास असल्याने २०१९ मध्ये जितके मतदान झाले त्यापेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केला.

मंडणगड येथे अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आज पार पडला. यावेळी सुनिल तटकरे बोलत होते.

राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही धर्मनिरपेक्षता विचार घेऊन काम करत आहोत. अल्पसंख्याक समाजातील तरुणांना ताकद देण्याचे काम केले आहे. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे निवडणूक आली की अनंत गीते फिरायला लागतात परंतु हा सुनिल तटकरे २४ तास तुमच्या सेवेत असतो आणि यापुढे कायम राहिन असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

एनडीए सरकार मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे असे गैरसमज पसरवले जातात परंतु याच एनडीए सरकारने अल्पसंख्याक बहुल समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या अल्पसंख्याक बहुल योजनेत मंडणगड तालुकाही आहे हेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले. शिवाय ४० वर्षे मी धर्मनिरपेक्ष विचार घेऊन काम करत आहे. एनडीएमध्ये सहभागी होताना शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांना घेऊन पुढे जात आहोत हेही स्पष्ट केले.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवावा यासाठी तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी प्रस्ताव ठेवला होता आणि वित्तमंत्री असताना त्यामध्ये वाढ केली होती असे सांगतानाच सुनिल तटकरे यांनी आता या महामंडळाचा सुमारे ८०० कोटी रुपये निधी झाला आहे याचे श्रेय अजितदादा पवार यांना जाते असेही सांगितले.

खासदार झाल्यावर रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर मच्छीमार समाज आहे त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईला जायला लागत होते मात्र पासपोर्ट कार्यालय अलिबागमध्ये सुरू केले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

इराणी कॉलेज महाराष्ट्रात नाहीय. त्यासाठी मुस्लिम समाजातील लोकांनी माझ्याकडे मागणी केली. आपले वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत प्रस्ताव देताच त्यांनी २४ तासात कॅबिनेटमध्ये ३४० कोटी रुपयांच्या निधीला (इराणी कॉलेजसाठी) म्हसळामध्ये मंजुरी दिली याशिवाय अल्पसंख्याक समाजाला वेगवेगळ्या योजनांतून मोठया प्रमाणावर निधी दिला आहे असेही सुनिल तटकरे यांनी बोलताना स्पष्ट केले.

प्रत्येकवेळी आपल्या समाजाचा वापर करण्यात आला आहे परंतु जो आपले काम कायम करत आला आहे त्यांच्या पाठीशी उभे रहायचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत घड्याळ या चिन्हावर बटण दाबून सुनिल तटकरे यांना विजयी करावे असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले.

अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, कार्याध्यक्ष वसीम बुर्‍हाण यांनी आपले विचार मांडले.

या मेळाव्याला अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, कार्याध्यक्ष वसीम बुर्‍हाण, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दळवी, रायगड जिल्हा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नजीब अलमारे आदींसह अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते