Pune Rains : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं; झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना
![Pune Rains : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं; झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना](https://i0.wp.com/azadmarathi.com/wp-content/uploads/2024/06/pune-rain-1.webp?resize=750%2C400&ssl=1)
Pune Rains : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचलं. लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. शहरातील विविध भागात अजूनही पाणी साचलं असून अग्निशमन दालाकडून रेस्क्यू ऑपरेशन वेगानं सुरु आहे.
काल पुण्यात अंगावर झाड कोसळून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला.अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागात झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना घडल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या काही भागात आणि देशाच्या इतर भागांसह दक्षिण महाराष्ट्रात पुढे सरकला असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, आणि मध्य प्रदेशात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभांगांनं वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्येही ही परिस्थिती कायम राहील, असं आयएमडीने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान