मिळालेल्या खात्यांबाबत शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा

मुंबई – शिंदे गटाती काही मंत्री हे खात्याबाबत असमाधानी असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ग्रामीण भागाशी संबंधित खातं मिळावं, यासाठी शिंदे गटातील काही जण आग्रही असल्याचं कळतंय. ग्रामविकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे गटातील काही मंत्री इच्छुक आहेत. या खात्यासाठी शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची कुजबूज ऐकायला मिळतेय.

tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या सार्वजनिक बांधकाम खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्याकडेच आहे. तर ग्रामविकास आणि जलसंपदा ही खाती अनुक्रमे गिरीष महाजन आणि देवेंद्र फडणवीस (Girish Mahajan and Devendra Fadnavis) यांच्याकडे आहेत. दरम्यान, आता सुरु असलेल्या चर्चांमुळे मंत्रिमंडळ विस्तार केला जातो का आणि खातेवाटपताही काही बदल होतो का, यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने आता काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचंय.