‘लेडी सेहवाग’चा शेफाली वर्माचा जलवा, केवळ ३१ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला इतिहास

Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. क्रिकेटमधील भारत आणि मलेशिया (India vs Malaysia) महिला संघ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या शेफाली वर्माने (Shafali Verma) धमाका केला आणि केवळ 31 चेंडूत अर्धशतक झळकावण्यात ती यशस्वी ठरली. शेफालीने 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली, ज्यात ती 4 चौकार आणि 5 षटकार मारण्यात यशस्वी ठरली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अर्धशतक झळकावणारी शेफाली पहिली महिला फलंदाज ठरली आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 50 षटकार ठोकणारी सर्वात तरुण फलंदाज बनण्याचा मानही तिने मिळवला.

आम्ही तुम्हाला सांगतो की, शेफाली वर्मा सध्या फक्त 19 वर्षांची आहे आणि ती ज्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत आहे ती अप्रतिम आहे. शेफालीने क्रीजमध्ये येताच तिने गोलंदाजांना जोरदार धोबीपछाड दिसा. यामुळेच पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने 15 षटकात 2 बाद 173 धावा केल्या. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-