Pune Sassoon Hospital | संतापजनक! आयसीयूत भरती रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू? ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Pune Sassoon Hospital News | पुण्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या ससून रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयसीयूत भरती असलेल्या एका रुग्णाला रुग्णालयातील उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. टीव्ही९ ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सागर रेणुसे (वय २०किंवा २१ अंदाजे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. १६ मार्च रोजी सागर याचा अपघातात त्याच्या मानेला मोठी दुखापत झाली होती. दरम्यान तो ससून रुग्णालयात (Pune Sassoon Hospital ) उपचारासाठी दाखल होता. त्याच्यावर क्रोमा सेंटरच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज उपचारदरम्यान उंदीराने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला, असा थेट आरोप सागर रेणुसेच्या नातेवाईकांनी केला आहे.

सागरचे मृत्यूचे फोटो आपल्या हाती लागले आहेत. यामध्ये उंदराने कानाला कुर्तडले असल्याचे खूण स्पष्ट दिसत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यावरून त्यांनी मोठा संताप व्यक्त करत ससून रुग्णालयाला घेराव घातला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ही नातेवाईकांनी घेतला आहे. याबाबत ससून रुग्णालयातील प्रशासनाकडून अद्याप कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका