Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू, जाणून घ्या नेमका अपघात कसा झाला 

पालघर – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry )यांचे मुंबईतील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले. पालघरच्या एसपींनी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी 3 च्या सुमारास झाला आणि त्यादरम्यान एक महिला त्यांची कार चालवत होती. या अपघातात कारमध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक सायरस मिस्त्री हे आहेत. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. कारमध्ये बसलेले इतर दोघे जिवंत आहेत.

अपघात कसा झाला? (Cyrus Mistry died in a road accident, know how the accident happened) 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या पहिल्या पुलावर दुभाजक होता, कार खूप वेगात होती आणि अचानक ती अनियंत्रितपणे डिव्हायडरला धडकली आणि कारमध्ये बसलेल्या सायरसचा मृत्यू झाला.

सायरस मिस्त्री कोण होते ?

सायरस मिस्त्री यांचाजन्म 4 जुलै 1968 रोजी भारतीय वंशाच्या आयरिश व्यापारी कुटुंबात झाला होता. सायरस व्यतिरिक्त, त्याच्या कुटुंबात आता त्याची आई पेरिन दुबास, त्याच्या दोन बहिणी लैला मिस्त्री आणि अलु मिस्त्री (Laila Mistry and Alu Mistry) आहेत. ते टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष होते. डिसेंबर २०१२ मध्ये रतन टाटा यांनी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्ष बनवले. 2016 मध्ये त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते.त्यांना अचानक पदावरून काढून टाकण्यात आल्याने त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती आणि ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये गेले होते जिथे निर्णय त्यांच्या बाजूने आला होता. मात्र, या निर्णयानंतर रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.