पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल 

नवी दिल्ली –  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की मुख्यमंत्री मान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाउपचारासाठी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल  पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र,मुख्यमंत्री मान यांच्या अॅडमिटच्या वृत्तावर रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

सूत्रांनी एएनआयला सांगितले की, मुख्यमंत्री मान यांची पोटदुखीसाठी तपासणी करण्यात आली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना संसर्ग झाल्याचे सांगितले. यापूर्वी बुधवारी, मान यांनीअमृतसरजवळ सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयितांच्या हत्येनंतर राज्यातील गुंडांवर यशस्वी कारवाई केल्याबद्दल पोलीस आणि गुंडविरोधी टास्कफोर्सचेअभिनंदन केले होते.

जगरूप सिंग रूपा आणि मनप्रीत सिंग अशी ठार झालेल्या गुंडांची नावे असून त्यांच्याकडून चकमकीनंतर एक एके-47 आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयानेजारी केलेल्या निवेदनात भगवंत मान म्हणाले की, राज्यातील गुंड आणि समाजकंटकांविरुद्ध राज्य सरका रने निर्णायक युद्ध सुरू केले आहे.