या ठाकरेंना स्वतःची गल्ली सांभाळता आली नाही आणि हे मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार होते – राणे

Mumbai – मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मंगळवारीही मुसळधार पाऊस कायम राहिला़. मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद १४० ते १५० मिमी एवढी झाली. उसंत न घेता सलग दुसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली तर लोकल रेल्वे (Local Railway)  सुरू असली तरी वेळापत्रक कोलमडले होते.

दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई आणि ठाण्यात पाऊस कायम राहणार आहे. शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून अतिमुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांतील वेगवेगळ्या भागात मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत, २४ तासांत १४० ते १५० मिमी पाऊस पडला.

दरम्यान, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने विरोधक शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य करू लागले आहेत. बांद्र्यातील एक व्हिडीओ शेअर करत भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केले. ते म्हणाले, हा मतदार संघ अजून कुठला नाही तर बांद्रा पूर्व मतदार संघ (Bandra East constituency) आहे ज्या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंब अनेक वर्षापासून राहतात. ठाकरेंचं घर या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटरवर आहे. या ठाकरेंना स्वतःची गल्ली सांभाळता आली नाही आणि हे मुंबईला जागतिक दर्जाचे शहर (World class city) करणार होते. असं म्हणत राणे यांनी टीका केली आहे.