सूर्यवंशी चित्रपटावर पाकिस्तानी अभिनेत्रीने केली टीका

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात आणि जिबरान नासिरने चित्रपटावर इस्लामोफोबियाचा आरोप केला होता.

‘सूर्यवंशी’ चित्रपटातील इस्लामोफोबियावर प्रतिक्रिया देताना मेहविशने केलेले ट्वीट केले की, ‘बॉलिवूडमधील नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट सूर्यवंशीमध्ये इस्लामोफोबिया पाहायला मिळाला. हॉलिवूडमध्ये अनेक गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे सीमेवरही असे काही पाहायला मिळेल. मी आधीही म्हटले होते की तुम्ही सकारात्मक दाखवू शकत नाही तर कमीत कमी मुस्लिमांची भूमिका योग्य पद्धतीने दाखवा. शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा’ या आशयाचे ट्वीट मेहविशने केले आहे.

दरम्यान ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.