राहुल गांधी ब्रिटनला रवाना; ‘या’ कार्यक्रमाला लावणार हजेरी 

नवी दिल्ली –  गुजरातमध्ये काँग्रेसला (Congress) बसलेल्या धक्क्यादरम्यान पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) गुरुवारी लंडनला (London) रवाना झाले. येथे ते 23 मे रोजी आयडियाज ऑफ इंडिया (Ideas of India) परिषदेला संबोधित करतील. त्यांचा भारतीय समुदायाला भेटण्याचा कार्यक्रमही आहे.  काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख आणि पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 23 मे रोजी केंब्रिज विद्यापीठात ( Cambridge University) राहुल गांधी  संबोधित करतील. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि प्रियांक खर्गेही उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी अशा वेळी लंडनला जात आहेत, जेव्हा अनेक राज्यांमध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरू आहे. हार्दिक पटेलने (Hardik Patel) गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा  (Resigned) दिला आहे. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका (Assembly elections) होऊ शकतात, त्यासाठी भाजपने (BJP) तयारी जोरात सुरू केली आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनातून ( Patidar reservation movement) बाहेर पडून तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेलने बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

नुकतेच काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्याशी दीर्घ संवाद झाला. मात्र त्यांनी पक्षाच्या समितीत सहभागी होण्याची ऑफर फेटाळून लावली होती. अलीकडेच काँग्रेसने उदयपूर(Udaipur), राजस्थान येथे चिंतन शिविराचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha elections) संघटना मजबूत करण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला होता.