आटा 22 रुपये लीटर आज 40 रुपये लीटर हो गया; राहुल गांधी यांनी पुन्हा करवून घेतली स्वतःची फजिती  

नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रामलीला मैदानावर महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या (Inflation, Unemployment and GST) मुद्द्यावरून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने (Congress) आयोजित केलेल्या हल्लाबोल रॅलीत ते बोलत होते. यावेळी महागाईवर बोलताना राहुल गांधींनी यूपीए सरकारच्या काळात गॅस, तेल, दूध आणि पिठाच्या  किमती सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता अचानक त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी पिठाचा भाव ४० रुपये लिटर सांगितला.

राहुल गांधी यूपीए सरकार आणि एनडीए सरकारमधील महागाईची तुलना करत होते. ते म्हणाले की, माझ्याकडे महागाईचे आकडे आहेत. 2014 मध्ये एलपीजी सिलेंडर 410 रुपये, आज 1,050 रुपये, पेट्रोल 70 रुपये लिटर, आज सुमारे 100 रुपये लिटर, डिझेल 70 रुपये लिटर आणि आज 90 रुपये लिटर. मोहरीचे तेल 90 रुपये लिटर आज 200 रुपये लिटर आहे. दूध ३५ रुपये लिटर आज ६० रुपये लिटर. आटा 22 रुपये लिटर आज 40 रुपये लिटर झाला आहे.

पुढे राहुल गांधींनी आपली चूक सुधारून लिटरऐवजी KG म्हटलं तरी आता बाण सुटला होता, मग काय सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना पुन्हा एकदा राहुल गांधींची टर उडविण्याची संधी मिळाली. आता स्वतः राहुल गांधी यांनीच संधी दिली तर भाजप कुठे गप्प बसणार होता.त्यांनीही वाहत्या गंगेतही हात धुतले. आता सोशल मीडियावर राहुलच्या या विधानावर ट्रोल खूप मजेदार कमेंट करत आहेत.  एका यूजरने सांगितले की,  जेव्हा माझा जन्म झाला नव्हता, तेव्हा पाइपलाइनद्वारे पीठ पुरवले जात होते आणि त्यावेळी ते खूप स्वस्त होते, परंतु हे मोदीजी आल्यापासून त्यांनी आपल्या मित्रांना फायदा व्हावा यासाठी प्रत्येक वस्तूच्या किमती वाढवल्या आहेत.