Rahul Gandhi | जेव्हा या अभिनेत्रीने व्यक्त केली होती राहुल गांधींसोबत लग्न करण्याची इच्छा, ठेवली होती एक अट

Sherlyn Chopra Wants To Marry Rahul Gandhi : प्रसिद्ध अभिनेत्री शर्लिन चोप्रा केवळ तिच्या बोल्डनेस आणि स्पष्टवक्तेपणासाठीच ओळखली जात नाही तर या अभिनेत्रीचा दीर्घकाळ वादांशीही संबंध राहिला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने शर्लिन प्रसिद्धीच्या झोतात येते. गेल्या वर्षी देखील अभिनेत्रीने असेच काही केले होते, ज्यामुळे तिची भरपूर चर्चा झाली होती. खरं तर, शर्लिनने काँग्रेस नेत्यासोबत सेटल होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शर्लिनने राहुल गांधीसोबत लग्नासाठी अट ठेवली होती
गेल्या वर्षी शर्लिन चोप्राला जेव्हा विचारण्यात आले होते की, तिला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत लग्न करायचे आहे का? याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की हो नक्कीच, पण यासाठी माझी एक अट आहे. होय, शर्लिनने राहुल गांधींसोबत लग्न करण्याची अट ठेवली होती. लग्नानंतर ती आडनाव बदलणार नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. लग्नाबाबत शर्लिनचे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.

शर्लिन चोप्रा तिच्या लूक आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते
आज शर्लिन चोप्राचा वाढदिवस आहे. चाहतेही शर्लिन चोप्राला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शर्लिन चोप्रा अनेकदा तिच्या लूक आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक लोकांचे लक्ष वेधून घेतो. शर्लिनचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर लोकप्रिय होतात.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी