राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

Mahesh Tapase  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)  यांनी केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे फेटाळला. शरद पवार यांच्या सूचनेनुसार 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असे देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले होते. हे दावे पूर्णपणे बिनबुडाचे आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे. आम्ही  फडणवीस यांना आठवण करून देऊ इच्छितो की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता आणि त्यावर पवारांचा सूचना असल्याचा आरोप खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, असेही तपासे पुढे म्हणाले.

महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभ्या असलेल्या मतदारांचा भ्रमनिरास करण्यासाठी भाजप नेत्यांची अशी विधाने हेतुपुरस्सर केली जातात. ऑपरेशन कमळ मुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या मतांचे फारसे नुकसान करता आलेले नाही आणि म्हणून फडणवीसांकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत अशी खोचक टीका महेश तपासे यांनी केली.

मला आश्चर्य वाटते की, भाजपला शरद पवारांचा क्रेझ सोडता येत नाही, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. नांदेड आणि औरंगाबादमधील बालकांच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस यांचे अकार्यक्षम सरकार जबाबदार आहे, हे महाराष्ट्रातील जनता कधीही विसरू शकत नाही असा घणाघाती आरोप तपासे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Puneet Balan : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस